Search This Blog

Friday, September 18, 2026

**विश्व पालि भाषा दिवस* 🌸📚 *पालि भाषा प्रशिक्षण* 🪷 एक दिवसीय पालि भाषा धम्म प्रशिक्षण शिबिर* 🪷📅 दि. १७ सप्टेंबर २०२६

🌸 **विश्व पालि भाषा दिवस* 🌸
📚 *पालि भाषा प्रशिक्षण* 
🪷 एक दिवसीय पालि भाषा धम्म प्रशिक्षण शिबिर* 🪷
📅 दि. १७ सप्टेंबर २०२६
भारतीय बौद्ध महासभा, चिंचपाडा शाखेच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच महाबोधी चळवळीचे अग्रणी अनागारिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार, शंकरनगर येथे एक दिवसीय पालि भाषा धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अनागारिक धम्मपाल यांचा जन्म १७ सप्टेंबर १८६४ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला. बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच बौद्ध तीर्थस्थळांच्या संवर्धनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त पालि भाषा आणि बुद्ध धम्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा विशेष हेतू होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सतीश पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आदर्शाची पुष्पपूजा, दीपपूजा व धूपपूजा करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. सतीश पवार यांनी प्रशिक्षणार्थींना पालि भाषा, पालि व्याकरण तसेच बुद्ध धम्माच्या अभ्यासासाठी पालि भाषेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आद. विजय झनके गुरुजी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विविध पदाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काही प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करून शिबिरातील अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सर्व उपस्थितांचे, प्रमुख मार्गदर्शकांचे, पदाधिकाऱ्यांचे व प्रशिक्षणार्थींचे आभार मानले. शेवटी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
🌿 पालि भाषा शिकूया — बुद्ध धम्म समजून घेऊया!
🌿 पालि भाषेच्या माध्यमातून धम्मज्ञानाचा प्रसार करूया!
🌿 अनागारिक धम्मपाल यांच्या धम्मकार्याला अभिवादन! 🙏
📸 या प्रसंगी घेतलेली काही क्षणचित्रे...
L
#विश्वपालिभाषादिवस
#अनागारिकधम्मपाल
#अनागारिकधम्मपालजयंती
#पालिभाषा
#पालिभाषाप्रशिक्षण
#बुद्धधम्म
#धम्मप्रशिक्षण
#पालिअभ्यास
#नालंदाबुद्धविहार
#भारतीयबौद्धमहासभा
#सतीशपवार
#विजयझनके
#धम्मप्रसार
#PaliLanguage
#BuddhistStudies

No comments:

Post a Comment